Soft skills – a need of an hour (Marathi)

नोकरी किंवा व्यवसाय करण्यात अपयश का येते?

नुकतेच एका वाहिनीवर एक बातमी दाखवण्यात आली की पुण्याच्या हिंजवडीतील IT park मध्ये मराठी employees चा टक्का फक्त २% आहे. आश्चर्य आहे ना, आपल्याच पुण्यात, आपलीच मराठी मुलंमुली एवढ्या अत्यल्प प्रमाणात…

आपली मराठी मुलंमुली अभ्यासात एवढे हुशार. आपल्याकडे MBA, MCA, Engineers, ITI तसेच अनेक क्षेत्रात graduates, Post-graduates…एवढे शिकलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. ह्यांच्या शिक्षणावर पालकांनी लागेल तेवढा खर्च केलेला असतो. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर खूप कमीच विद्यार्थी पुढे job मिळवतात. काही विद्यार्थी job न मिळाल्यावर पुढचे शिक्षण घेत राहतात तर काही जण मिळेल ते काम करतात. घरी सगळं सधन असल्यास काही विद्यार्थी घरचा व्यवसाय करतात किंवा शेती करतात.

काही विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात पण मुलाखतीत विचारला जाणारा ‘ Tell me about yourself?’ ह्या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकांना अपयश येते.  का येत असावे हे अपयश ???

अशी अनेक उदाहरणे आहेत की distinction मिळालेले विद्यार्थीसुद्धा soft skills चा अभाव असल्यामुळे interviews मध्ये reject झाले आहेत.

ह्याचा विचार ना विद्यार्थी करतात, ना पालक ना शिक्षण संस्था. फक्त अभ्यासात चांगले गुण मिळवणे एवढेच उद्दीष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यांच्या positive attitude, emotional intelligence, intrapersonal skills, interpersonal skills, communication skills, आणि interview skills ह्या soft skills कडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. पण अनेक companies ह्यांच्या मते, job मिळवण्यासाठी किंवा successful होण्यासाठी IQ पेक्षा EQ, तसेच Hard skills पेक्षा Soft skills जास्त महत्वाचे आहेत. म्हणून तर Soft skills ला Employability skills ( रोजगार कौशल्य ) असे ही संबोधले जाते.

आपण जेव्हा एखादी छोटीशी वस्तू घेतो तेव्हा ती पारखून घेतो मग शिक्षण घेताना आपण नक्कीच पारखून घेणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होतो आहे का?, हे पाहणे प्रत्येक पालकाचे कर्तव्यच आहे.  शिक्षण घेऊन  नुसते certificate घ्यायचे की ते certificate मिळवून चांगले career घडवायचे हे प्रत्येक विद्यार्थ्याने तसेच पालकाने विचार करण्याची गरज आहे…✍️

Education and Career Coach