मी पाहिलेल्या मुलाखती…

मला काही interviews attend करण्याची संधी मिळाली. Interviews मध्ये काही Graduates, Post graduates, Engineering, MCA आणि MBA candidates होते.

Interview मध्ये मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या :

१. अर्ध्याहून अधिक candidates sandals, slippers घालून आले होते;
२. काही candidates jeans घालून आले होते;
३. काही candidates t-shirts मध्ये होते;
४. काहीजण formals मध्ये होते पण कपड्यांचे रंग खूपच भडक होते;
५. मुलांपैकी बहुतांश clean shave look मध्ये नव्हते;
६. काहीजण सतत mobile phone चा वापर करत होते;
७. काहीजण मित्रांशी किंवा फोनवर मोठ्याने बोलत होते;
८. बहुतांश candidates ची body language professional नव्हती.
९. काहीजणांचा attitude professional नव्हता.

जेव्हा interview चा निकाल लागला तेव्हा वरच्यांपैकी कोणाचेही selection झाले नाही. सर्व candidates ला जवळपास सारखेच टक्के होते. पण वरील नमूद केल्याला गोष्टींमुळे बहुतांश candidates interview देण्याआधीच interview मधून जवळजवळ बाहेर पडले होते. जे select झाले त्यांना चांगले package मिळाले.

Interviewers कधी selection न होण्याचे कारण सांगत नाहीत.

Training घेताना माझा नेहमी हा प्रयत्न असतो की प्रत्येक participants ला ह्या गोष्टी समजून सांगाव्यात व mock interview session मध्ये selection होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी करून घ्याव्यात. त्याचा चांगला  परिणाम मला placement मध्ये दिसतो. माझ्याकडे trained झालेले बहुतांश participants चांगल्या companies/organizations मध्ये job ला लागले आहेत. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की कोणाच्यातरी यशामध्ये माझा खारीचा वाटा आहे.

Interviews फक्त ५-१० मिनिटांची असते. कधीकधी वेळ जास्त होऊ शकतो. पण त्या वेळेत आपण कसे आपल्या व्यक्तिमत्वाचे, आपण मिळवलेल्या ज्ञानाचे आणि आपल्या योग्यतेचे सादरीकरण करतोय, ह्यावर आपले selection अवलंबून असते.

आशा आहे हा लेख interview ची तयारी करणाऱ्या candidates ला उपयोगी ठरेल…✍️

Interview Skills Trainer