कुठलेही काम करताना talent हे लागतेच पण यशप्राप्तीसाठी talent बरोबर अनेक गोष्टीही लागतात, ज्या आज मी ह्या लेखात नमूद करत आहे.
असे मानले जाते की ह्या 10 गोष्टींचा व्यक्तीच्या यशामध्ये मोलाचा वाटा असतो.
_______________________________________________

कोणीतरी खरे सांगितले आहे, ‘ वेळ कोणासाठी थांबत नाही ‘ म्हणून जेव्हा वेळ असतो तेव्हा त्याचा सदुपयोग करावा. गेलेली वेळ परत कधीच येत नाही. जो व्यक्ती आपले प्रत्येक काम वेळेत पूर्ण करतो, दुसऱ्यांना दिलेली वेळ पळतो, तसेच वेळेची कदर करतो, तोच यशस्वी होतो.
_______________________________________________

खूप वेळा असे होते की लोकं अपयशाला कंटाळून प्रयत्न सोडून देतात. पण काही लोकं कितीही अपयश आले तर तग धरून प्रयत्न चालू ठेवतात आणि पुढे तेच यशसवी होतात. प्रयत्नशील व्यक्ती नेहमी यशाकडे वाटचाल करत असतो.
_______________________________________________

काही लोकं खूप हुशार असतात पण त्यांच्यात उत्साह कमी असतो. त्याची अनेक कारणे असू शकतात जसे की योग्य आहार न घेणे, प्राणायाम व व्यायाम न करणे, चिडचिडा स्वभाव असणे. ज्या व्यक्तींमध्ये energy level जास्त असते ते जास्तवेळ काम करू शकतात व यशस्वी होतात.
_______________________________________________

Attitude म्हणजे दृष्टिकोन. आजकाल companies knowledge पेक्षा Positive Attitude ला जास्त महत्व देतात. सकारात्मक दृष्टिकोनामुळे कठीण परिस्थितीवर ही मात करता येते.
_______________________________________________

असे म्हणतात कुठले ही काम करत असाल तर ते मनापासून करावे. तुम्ही किती हुशार आहात ह्यापेक्षा त्या कामाची तुम्हाला आवड किती आहे ह्याच्यावर तुमचा आनंद आणि यश अवलंबून असते.
_______________________________________________

तुमचे संवाद कौशल्य तुमच्या verbal आणि non-verbal communication वर अवलंबून असते. Non-verbal communication म्हणजे तुमच्या चेहऱ्याचे हावभाव, तुमचा आवाज, तुमची देहबोली होय. असे म्हणतात ज्याचे non-verbal communication चांगले असते त्याला यश प्राप्तीच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
_______________________________________________

सतत शिकत राहणे, स्वतःला विकसित ठेवणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. यशस्वी होण्यासाठी शिकण्याची वृत्ती जोपासणे आवश्यक आहे.
_______________________________________________

अनेक लोक जेवढे काम सांगितले आहे तेवढेच करतात. त्यामुळे त्यांची क्षमता मर्यादित राहते. नेहमी आपण काम अजून किती चांगल्या प्रकारे करू शकतो ह्याचा विचार होणे गरजेचे आहे आणि शक्य असल्यास थोडे जास्तच काम नक्की करावे.
_______________________________________________

एक म्हण खूप प्रचलित आहे ‘ तहान लागल्यावर विहीर खणणे ‘ ह्याचा अर्थ शेवटच्या क्षणी काम करणे होय. एखादे काम आपण हातात घेतले की त्या कामासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवणे आवश्यक असते. तुमचा आत्मविश्वास तुम्ही केलेल्या तयारीवर अवलंबून असतो.
_______________________________________________

कुठलेही काम करताना त्या कामाबदल आपली निष्ठा आणि आपली नीतिमत्ता असणे महत्वाचे असते. नीतिमत्तेने काम केल्यास आपल्याला कामामध्ये आनंद आणि यशप्राप्ती मिळण्यास मदत होते.
_______________________________________________