महाराष्ट्र दिन !!!

आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. सर्वांना शुभेच्छा 🙏

आपला महाराष्ट्र, एक समृद्ध राज्य आहे. इथे नैसर्गिक संपत्ती भरभरून आहे. सुपीक जमीन, मुबलक पाणी, चांगला पाऊस, समुद्र किनारा, सह्याद्री रांगा. आणि मेहनती लोक. एवढी धनसंपत्ती आणि समृद्धी असल्यामुळे हा महान + राष्ट्र = महाराष्ट्र म्हणून संबोधिला जातो.

आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज असे दैवी व्यक्तित्व असलेले राजे लाभले, हे समस्त रयतेचे भाग्यच म्हणावे लागेल. त्यांनी समस्त लोकांना त्यांच्या योग्यतेची जाणीव करून दिली. महाराजांना जगात ‘ Management Guru’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या कौशल्याने अनेक आक्रंतांवर (परकीय हल्लेखोर) मात केली, जनता सुखी आणि समृद्ध केली. छत्रपती शिवाजी महराजांनी होतकरू लोकांना जगण्याचे साधन दिले. त्यांनी वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याचा पाया रचला. स्वावलंबन म्हणजेच स्वराज्य ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिली आहे. त्यांनी शेती व्यवसाय सबळ केला, राज्यातच शस्त्र बनविले, स्वतःचे नौदल उभे केले. खऱ्याअर्थाने महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् बनविले.

आपण सगळे त्यांचे मावळे आहोत, त्यांचे अनुसरण करणे आपले कर्तव्यच आहे. महाराष्ट्राला जर खरेच आपल्या शिवरायांचा महाराष्ट्र बनवायचा असेल तर स्वावलंबन हा एकच पर्याय. महाराष्ट्रातील छोटे-मोठे उद्योगधंदे आता भूमिपुत्रांच्या हातात घेण्याची वेळ आली आहे. त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करू. आपल्यामध्ये एक म्हण आहे की ‘नात्यांमध्ये व्यवहार नको’, पण ती म्हण बदलण्याची गरज आहे, आता आपल्याला नात्यात व्यवहार आणि व्यवहारात नाती सांभाळता आलीच पाहिजेत. भूमिपुत्रांनी भूमिपुत्रांना साह्य केले पाहिजे, त्यांना व्यवसायात मदत केली पाहिजे. त्यांच्याकडून घेतलेल्या वस्तू किवा सहयोगाचे योग्य मूल्य देऊन त्यांच्या व्यवसायाला हातभार लावणे काळाची गरज आहे.

महाराष्ट्राचे हित राज्याचे अर्थकारण भूमिपुत्रांच्या हातात असण्यातच आहे आणि ते व्हावे असे वाटत असेल तर महाराष्ट्रातील छोटे मोठे व्यवसाय भूमिपुत्रांच्या हातातच असले पाहिजेत.

आता आपल्यालाही स्वावलंबी बनण्याची गरज आहे. ‘Make in India’ सारखेच ‘Make in Maharashtra’ बोलण्याची वेळ आली आहे. एक आत्मनिर्भर महाराष्ट्राचं आत्मनिर्भर भारत बनऊ शकतो.

11cac407e62dd156d5233b59fe6770811767751192.jpg

चला उठा मावळ्यांनो, सज्ज व्हा, हर हर महादेव बोला आणि कामगिरी फत्ते करा.

जय शिवाजी 🚩 जय भवानी 🚩

जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

Author: ABLES

Dear Friends, I welcome all of you to ABLES, a journey to lead happy, prosperous, and successful life. Mr Amol Dixit

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: