ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत, पालकांनी मुलांच्या EQ (emotional quotient) म्हणजे भावनिक योग्यता वाढवण्यासाठी प्रयत्न केला तर ती त्यांच्या भावी जीवनासाठी योग्य गुंतवणूक होईल.
शाळेमध्ये मुलांच्या IQ (Intelligence Quotient) म्हणजे बौद्धिक योग्यता वाढवण्यासाठी भर दिला जातो , पालक पण आपल्या मुलांचे मूल्यांकन Marks वरूनच करतात.
पण ही उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे एक सुवर्ण संधी असते, मुलांचे स्वतःशी नाते घट्ट करण्याची, आपल्या आईवडील यांचयाशी नाते घट्ट करण्याची, आपली सामाजिक बांधिलकी समजून घेण्याची.
पालकांनी त्यांना योग्य रीतीने प्रोत्साहित केले तर मुलांच्या आंतरिक गुणांना चांगलाच वाव मिळतो, त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, व त्यांचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.
हे सगळे साध्य करण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना होईल तेवढा वेळ देणे गरजेचे आहे . त्यांनी त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना योग्य शिबिरात enroll करून, त्यांच्या व्यक्तीमत्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे.

जास्त TV आणि Mobile मूळे मुलांच्या मनावर, डोळ्यांवर आणि बुद्धी वर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे शक्यतो पालकांनी स्वतः TV आणि Mobile चा वापर मुलांसमोर टाळावा व जेवढे जास्त शक्य होईल तेवढे मुलांशी गप्पा माराव्यात, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपली मुले आपल्या म्हातारपणी आपल्याला वेळ द्यायला शिकतील.
प्रत्येक पालकांची ही जवाबदारी असते की त्यांनी त्यांच्या मुलांना यशस्वी होण्याबरोबर , एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि पालक हे उन्हाळ्याच्या सुट्टी योग्य प्रकारे साध्य करू शकतात.
सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना ही उन्हाळ्याची सुट्टी आनंदाची जाओ हीच शुभेच्छा…
