रोजगाराची कौशल्ये ही वैयक्तिक गुण आणि मूल्ये आहेत जी आपल्याला कोणत्याही कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यास साहाय्य करतात.
- यांस कधीकधी सॉफ्ट स्किल, एंटरप्राइझ कौशल्ये, दळणवळणाची कौशल्ये किंवा कामाच्या ठिकाणी लागणारी कौशल्य म्हटले जाते;
- या प्रकारच्या कौशल्यामुळे तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता;
- ते कामाच्या ठिकाणी मिळणार्या यशाची गुरुकिल्ली आहेत;
- ते आपल्याला इतरांसह चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतात, समस्यांचे निराकरण करण्याची प्रेरणा देतात. त्यापैकी काही कौशल्ये खाली नमूद केले आहेत :

१. संभाषण कौशल्य;
२. लोकांशी वागण्याचे कौशल्ये;
३. सांघिक कौशल्य;
४. समस्या सोडविण्याचे कौशल्य;
५. नियोजन आणि आयोजन कौशल्य;
६. स्व-व्यवस्थापन;
७. नेतृत्वगुण;
८. भावनिक बुद्धिमत्ता;
९. वाटाघाटी कौशल्य;
१०.जीवन कौशल्ये.
आजच्या आधुनिक काळात रोजगार कौशल्यांना महत्त्व दिले जाते कारण ते सहकारी आणि ग्राहकांसह आपले कार्य कसे केले जाते, आपले कार्यप्रदर्शन आणि आपल्या कारकीर्दीतील यशाशी जोडलेले असतात. ते बर्याचदा आपली कार्यक्षमता सुधारतात, चुका कमी करतात आणि आपल्या सहकाऱ्यांशी सहकार्याने वागण्यास प्रोत्साहित करतात, ज्यामुळे आपली भूमिका अधिक प्रभावी आणि सक्षम होते.
रोजगार कौशल्ये आपल्या जीवनातील बर्याच टप्यात विकसित केली जाऊ शकतात – शाळेत, कामाच्या ठिकाणी आणि छंद किंवा खेळाद्वारे. तसेच, आपण त्यांचा विकास निरंतर प्रशिक्षणद्वारे करु शकतो. त्यासाठी अनेक कोचिंग सेशनदेखील उपलब्ध आहेत.
रोजगार कौशल्यांचा विकास आपल्याला नोकरी शोधत असताना इतर उमेदवारांमध्ये सरस ठरण्यास मदत करतात. इतर उमेदवारांकडे समान पात्रता आणि अनुभव असले तरी, आपल्याकडील रोजगार कौशल्ये कामावरील भूमिकेसाठी विशेषतः उपयुक्त ठरतात.

Amar
LikeLike
That’s was nice subject
LikeLiked by 1 person
Thanks 😊
LikeLike
That’s was nice subject
LikeLiked by 1 person
Thanks 😊
LikeLike