समुपदेशन म्हणजे नेमके काय?, हे जाणून घेण्याची खूप लोकांमध्ये उत्सुकता असते. खूप जणांना समुपदेशन आणि मार्गदर्शन म्हणजे एकच, असा गैरसमज आहे. पण , हे दोन्ही वेगवेगळे घटक आहेत.
समुपदेशन करण्यासाठी empathy म्हणजेच दुसऱ्याला समजून घेणे, त्याच्या विचारांचे आदर करणे, तसेच अनेक विचारांपैकी योग्य निर्णय घेण्यास मदत करणे. समुपदेशन हे अधिक सखोल मानसिक विश्लेषण आहे.
मार्गदर्शन करताना मार्गदर्शक suggestions देतात. ते त्यांचा अनुभव व expertise प्रमाणे सर्वांना मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन हे अधिक बाह्य असते.
समुपदेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असलेल्या समस्यांचा उकल करून त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यास व सोडवण्यास मदत करणे. समुपदेशक हा त्या व्यक्तीस एक मानसिक आधार देतो जेणेकरून त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व तो आपल्या जीवनाकडे व समस्यांकडे अधिक सकारात्मकतेने बघायला लागतो. थोडक्यात, आपलाच गुंता आपणच सोडविण्यासाठी समुपदेशक साहाय्य करतात.
समुपदेशनाला कोणतीही वयोमर्यादा नाही. बालकांपासून प्रौढ तसेच वृद्धांपर्यंत कुणालाही समुपदेशनाची गरज भासू शकते. फक्त वयोमानाप्रमाणे समुपदेशन करण्याची पद्धत बदलावी लागते.
समुपदेशनमुळे आपण काय करीत आहोत, ते कशाप्रकारे करायला हवे, याची जाणीव होते.
आपण बर्याच वेळा नकारात्मक विचार करत असतो. समजा दहा गोष्टी चांगल्या घडल्या अन् एक मनाविरुद्ध घडली तर आपण त्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीचेच सारखे चिंतन करीत बसतो. नैराश्यच चघळत बसतो. अशा व्यक्तींत समुपदेशनाने बराच फरक पडतो. नैराश्य आलेली व्यक्तीदेखील सकारात्मक विचार करू लागते. तिचा आत्मविश्वास वाढतो.
इतरांच्यात न मिसळणे, अचानक वर्तनात झालेला बदल, अबोलपणा, जीवन संपविण्याचे विचार, एखाद्या बाबतीत आलेले औदासिन्य वगैरे. अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी समुपदेशनाद्वारे सुसंवाद साधायला हवा. आजच्या युवा पिढीला तर समुपदेशनाची खूपच गरज आहे.
जवळजवळ सर्वच क्षेत्रात समुपदेशनाची गरज आहे. उद्योग म्हटला की माणसांशी संबंध येतो. अन् माणसांना उद्योगाच्या क्षेत्रात काम करत असताना अनेक समस्या भेडसावत असतात. त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादनक्षमतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी समुपदेशन खूप महत्त्वाचे आहे. कारण काही वेळेला कामगारांना होणारा त्रास ते मालकांकडे बोलून दाखवत नाहीत व त्याचा परिणाम कामावर होतो. समुपदेशनामुळे सुसंवाद साधला जातो व समस्यांवर सकारात्मक उपाययोजना करता येतात.

९६०४९००४५८