
परीक्षेची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे अनेक घरांमधील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत.
एसएससी, एचएससी आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेस बसणारे विद्यार्थी आणि पालक, हे बदल जास्त प्रमाणात अनुभवत आहेत.
परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थ्याबरोबर पालकही प्रयत्न करतात. पण, सर्व प्रयत्नांनंतरही काही विद्यार्थी हुशार असूनही परीक्षेत त्यांच्या योग्यतेनुसार गुण मिळवण्यात काही प्रमाणात अपयशी ठरतात.
परिस्थिती तेव्हा थोडी बिकट होते जेव्हा पालक आणि नातेवाईक कारण न कळता टिप्पणी करतात ” थोडा अजून अभ्यास केला असता तर अजून गुण मिळाले असते.” यामुळे विद्यार्थ्यांची आणखी निराशा होते.

मी परीक्षा व ताण व्यवस्थापन या विषयांवर सत्र आयोजित करतो. याला विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसेच संस्थांकडून सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
माझ्या सत्रांदरम्यान मी एक सामान्य निरीक्षण केले, ते म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण न मिळाल्यास होणाऱ्या वाईट परिणामांविषयी माहिती असते, परंतु परीक्षेत चांगले गुण मिळाले तर उज्ज्वल भविष्याबद्दल त्यांना माहिती थोडी कमी असते.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात आणि करिअरमध्ये परीक्षांचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. परीक्षा म्हणजे त्यांची योग्यता सिद्ध करण्यासाठी संधी आणि व्यासपीठ म्हणून पाहण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याचे आणि त्यामध्ये चांगले कामगिरी करण्याच्या इतर फायद्यांविषयी जागरूक केले पाहिजे.
मुलांच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची जबाबदारी ही पालकांची आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मकतेने यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
सर्वांना शुभेच्छा !!!
