आत्मनिर्भर व्हा !!!

नुकताच आपण महाराष्ट्र दिन साजरा केला. सर्वांना शुभेच्छा. हा महाराष्ट् दिन आपण घरी बसूनच साजरा केला. महामारीमुळे जागतिक पातळीवर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, त्याचा आपल्या भारतावर ही परिणाम झाला आहे. प्रत्येक राज्यावरही आर्थिक संकट आले आहे.

प्रत्येकाने अापल्या घरचा रस्ता धरणेच श्रेयस्कर मानले. महाराष्ट्रातही तेच घडले. अनेक लोक आपल्या राज्यात निघून गेले. खरे पाहिले तर महामारी ही वाईटच पण ती महाराष्ट्रातल्या भूमीपुत्रांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. आपला महाराष्ट्र, एक समृद्ध राज्य आहे. इथे नैसर्गिक संपत्ती भरभरून आहे. सुपीक जमीन, मुबलक पाणी, चांगला पाऊस, समुद्र किनारा, सह्याद्री रांगा. आणि मेहनती लोक. एवढी धनसंपत्ती आणि समृद्धी असल्यामुळे हा महान + राष्ट्र = महाराष्ट्र म्हणून संबोधिला जातो.

आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज असे दैवी व्यक्तित्व असलेले राजे लाभले, हे समस्त रयतेचे भाग्यच म्हणावे लागेल. त्यांनी समस्त लोकांना त्यांच्या योग्यतेची जाणीव करून दिली. महाराजांना जगात ‘ Management Guru’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या कौशल्याने अनेक आक्रंतांवर (परकीय हल्लेखोर) मात केली, जनता सुखी आणि समृद्ध केली. छत्रपती शिवाजी महराजांनी होतकरू लोकांना जगण्याचे साधन दिले. त्यांनी वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याचा पाया रचला. स्वावलंबन म्हणजेच स्वराज्य ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिली आहे. त्यांनी शेती व्यवसाय सबळ केला, राज्यातच शस्त्र बनविले, स्वतःचे नौदल उभे केले. खऱ्याअर्थाने महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् बनविले.

आपण सगळे त्यांचे मावळे आहोत, त्यांचे अनुसरण करणे आपले कर्तव्यच आहे. ह्या महामारीने महाराष्ट्रातील युवक आणि युवतींना एक सुवर्णसंधी दिली आहे. महाराष्ट्राला जर खरेच आपल्या शिवरायांचा महाराष्ट्र बनवायचा असेल तर स्वावलंबन हा एकच पर्याय. महाराष्ट्रातील छोटे-मोठे उद्योगधंदे आता भूमिपुत्रांच्या हातात घेण्याची वेळ आली आहे. त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करू. आपल्यामध्ये एक म्हण आहे की ‘नात्यांमध्ये व्यवहार नको’, पण ती म्हण बदलण्याची गरज आहे, आता आपल्याला नात्यात व्यवहार आणि व्यवहारात नाती सांभाळता आलीच पाहिजेत. भूमिपुत्रांनी भूमिपुत्रांना साह्य केले पाहिजे, त्यांना व्यवसायात मदत केली पाहिजे. त्यांच्याकडून घेतलेल्या वस्तू किवा सहयोगाचे योग्य मूल्य देऊन त्यांच्या व्यवसायाला हातभार लावणे काळाची गरज आहे.

एकदा मी माझ्या मुलाला diet plan दिला होता, तो sportsperson असल्यामुळे त्याला त्याची नितांत गरज होती. मी एका client प्रमाणे नीट अभ्यास करून त्याचा diet plan बनिवला व त्याला तो दिला. त्याने मला माझी फी विचारली. मी त्याला असू दे असे बोललो, पण त्याने माझ्या हातात एक रुपया दिला आणि बोलला ही तुमची फी. लहान असल्यामुळे एवढेच देऊ शकतो. मी त्याला ती परत देऊ केली पण तो म्हणाला की तुम्ही एवढी मेहनत घेतली मग तुम्हाला फी दिलीच पाहिजे. हे एकूण मला आनंद झाला की माझ्या मुलाला दुसऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे ते. हीच जाणीव आता आपल्याला आपल्या लोकांबद्दल ठेवावी लागणार आहे. हा प्रसंग सांगण्याचे कारण असे की तुम्ही सुद्धा आपल्या स्वकीयांकडून काही घेतले तर त्याचे मूल्य नक्की चुकवा, म्हणजे दुसरेपण त्यांचे पैसे देण्यास प्रेरित होतील. त्यांच्या मेहनतीचे चीज होईल.

भारतीय लोकांनी परकियांबरोबर व्यवहार करून स्वतःचे खूप नुकसान करून घेतले आहे. अनेक अाक्रांता आपल्या देशात व्यापारी म्हणूनच आले नंतर आपले शासक बनले. राज्यांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला. महाराष्ट्राचे हित राज्याचे अर्थकारण भूमिपुत्रांच्या हातात असण्यातच आहे आणि ते व्हावे असे वाटत असेल तर महाराष्ट्रातील छोटे मोठे व्यवसाय भूमिपुत्रांच्या हातातच असले पाहिजेत.

आता आपल्यालाही स्वावलंबी बनण्याची गरज आहे. ‘Make in India’ सारखेच ‘Make in Maharashtra’ बोलण्याची वेळ आली आहे. एक आत्मनिर्भर महाराष्ट्राचं आत्मनिर्भर भारत बनऊ शकतो.

11cac407e62dd156d5233b59fe6770811767751192.jpg

चला उठा मावळ्यांनो, सज्ज व्हा, हर हर महादेव बोला आणि कामगिरी फत्ते करा.

जय शिवाजी 🚩 जय भवानी 🚩

जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

Author: ABLES INDIA

Dear Friends, I welcome all of you to ABLES, a journey to lead happy, prosperous, and successful life. Mr Amol Dixit

%d bloggers like this: