विचार ही एक कल्पना किंवा मत आहे जे प्रयत्नाने किंवा अचानक मनात येते. आपल्या जगास शक्य तितक्या चांगल्या प्रकारे समजून घेणे हा विचार करण्याचा हेतू आहे. मन हे विचार करण्यासाठी विकसित झाले आहे, जेणेकरून आपण आपल्या पर्यावरणास चांगल्या प्रकारे अनुकूल करून जगू शकतो आणि उत्कर्ष कसा करावा याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ शकतो.
एक विचार सहसा ३० सेकंद किंवा एक मिनिट टिकतो. सर्वसाधारणपणे आपला मेंदू आपल्या एकूण उर्जेच्या गरजेपैकी २०% ऊर्जा वापरतो. दिवसात तो सरासरी ४०० – ५०० कॅलरीचा वापर करतो. आपले विचार ऊर्जा आहेत, आपले शब्द ऊर्जा आहेत आणि आपल्या कृतीही ऊर्जा आहेत. आपण विचार, शब्द आणि कृतींद्वारे अभिव्यक्ती निर्माण करतो, जे वस्तू, परिस्थिती आणि अनुभव तयार करण्यासाठी ही उर्जा वापरतात.
अनेक संशोधनांनुसार, एक व्यक्ती दररोज सुमारे १२,००० ते ६०,००० विचार करतो. आश्चर्य म्हणजे, त्यापैकी ८०% विचार नकारात्मक असतात आणि ९०% विचारांची पुनरावृत्ती असते. परंतु काही संशोधनानुसार एकूण विचारांपैकी ९८% विचार हे आदल्यादिवशीचेच विचार असतात. ह्यावरून, आपल्याला असे लक्षात येते की आपण किती चुकीच्या पद्धतीने आपल्या विचारशक्तीचा वापर करतो. आपण आपली ही ऊर्जा नकारत्मक आणि निरुपयोगी विचार करण्यात अधिक खर्च करतो.
सर्वात जास्त केले जाणारे नकारात्मक विचार खालीलप्रमाणे आहेत :
* मी हे करू शकत नाही;
* माझ्याकडे पुरेसा वेळ नाही;
* मी हरलो आहे ;
* जगामध्ये काहीच चांगले नाही;
* मी काय करतो हे मला माहित नाही;
* कोणीही माझी काळजी घेत नाही; असे नकारात्मक विचार करून जीवनात सकारात्मक गोष्टींची किंवा यशाची अपेक्षा ठेवणे म्हणजे एक मोठी चूकच ठरू शकते.
असंख्य संशोधनतुन असे दिसून आले आहे की आपल्या ज्ञानाच्या फक्त ५% क्रिया (निर्णय, भावना, कृती, वर्तन) जागरूक आहे तर उर्वरित ९५% अचेतन पद्धतीने तयार केली जाते.
वैचारिक शक्ती आपली वास्तविकता तयार करण्याची गुरुकिल्ली आहे. भौतिक जगात आपल्या लक्षात येणार्या प्रत्येक गोष्टीचे मूळ आपल्या विचारांत आहे. आपल्या नशिबाचे स्वामी होण्यासाठी, आपण आपल्या विचारांचे स्वरूप नियंत्रित करायला शिकले पाहिजे.
प्रत्येक विचार काही प्रकारचे रसायन सोडतो. जेव्हा सकारात्मक विचार उत्पन्न होतात, तेव्हा आपल्याला आनंदी किंवा आशावादी असल्यासारखे वाटते आणि त्यामुळे सकारात्मक भावना निर्माण होते.
आपले विचार सकारात्मक बनविण्यासाठी आपण आपल्या मनास प्रशिक्षित करू शकता किंवा एखाद्या तज्ञ / प्रशिक्षकाची मदत घेऊ शकता. एकदा का आपण आपल्या विचारांवर प्रभुत्व प्राप्त केले की आपल्याला जाणीव होते की जीवनात आनंदी, समृद्ध आणि यशस्वी होणे सहजरित्या शक्य आहे…✍️
