खरेच आयुष्य किती स्वप्नवत असते ।
हा हा म्हणता बालपण सरले ।
शाळा संपली, कॉलेज ही संपले।
राहिल्या नुसत्या आठवणी।
ते रुसवे ते फुगवे ।
ते राग ते हसणे ।
कोणाशी तरी खूप बोलणे व कोणाशी तरी एक शब्द ही न बोलणे ।
आता राहिल्या फक्त आठवणी।
ते आनंदाचे क्षण काही दुःखाचे ।
काही क्षण कधीच संपू नये असे वाटणे, तर काही लवकर निघून जावेत असे होणे ।
कधी कधी पोट दुःखे पर्यंत हसणे तर कधी किती रडू असे होणे ।
आता राहिल्या नुसत्या आठवणी ।
आलेले यश साजरे करणे ।
अपयश ही आपलेसे करणे ।
मोठया मोठया इच्छा उराशी बाळगणे ।
त्या पूर्ण करण्यासाठी खटपट करणे।
आता राहिल्या फक्त आठवणी।
किती काही करायचे होते।
खूप काही केले ही, तरी खूप काही करायचे राहून गेले।
वाटते कधी कधी खूप वर्ष जगलो आपण , पण खरे जीवन जगणेच राहून गेले।
आयुष्याच्या संध्येला प्रत्येकाला नक्कीच असे वाटून जाते।
खरेच आयुष्य किती स्वप्नवत असते ।
